Advertisement

शिवसैनिकांच्या गर्दीत मुंबईत महाआरत्या!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत शरयू नदीच्या काठी हजारो शिवसैनिकांसह महाआरती केली. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं.

शिवसैनिकांच्या गर्दीत मुंबईत महाआरत्या!
SHARES

''हर हिंदू की यही पुकार… पहले मंदिर फिर सरकार” असा नारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत शरयू नदीच्या काठी हजारो शिवसैनिकांसह महाआरती केली. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतही शेकडो शिवसैनिकांनी सिद्धिविनायक मंदिरासह ठिकठिकाणी महाआरती केली.


कुठे कुठे महाआरती?

प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर, परळ येथील खापरेश्वर हनुमान मंदिर, विलेपार्ले पूर्व येथील शिवाजी चौकात असलेल्या राम-हनुमान मंदिर यांसह विविध ठिकाणी महाआरती करण्यात आली. यासाठी शिवसैनिकांसह, नेते मंडळीही उपस्थित होते.


कुणाचा सहभाग?

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ संध्याकाळी ६ च्या दरम्यान महाआरतीला सुरूवात करण्यात आली. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते , शिवसेना सचिव खासदार विनायक राउत आणि आदेश बांदेकर यांनी स्वतः आरती करण्यास सुरूवात केली. त्यांनतर इतर शिवसेना नेते व पद अधिकाऱ्याना आरतीचा मान देण्यात आला. या आरतीत प्रभादेवी, दादर, वडाळा, माहीम या ठिकाणच्या शिवसैनिकंसह मुंबईचे डबेवालेही सहभागी झाले होते.हेही वाचा-

Live Updates: राम मंदिर उभारण्याची तारीख सांगा, उद्धव यांचं भाजपाला अल्टिमेटम

राम मंदिर कधी बांधणार? तारीख सांगा- उद्धव ठाकरेसंबंधित विषय
Advertisement