Advertisement

'यही है अच्छे दिन'! सेनेचा भाजपवर बाण

युवा सेनेतर्फे मुंबईतील माहीम प्रभादेवी आणि अन्य परीसरात 'यही है अच्छे दिन' असे पोस्टर लावण्यात आले आहेत. 2015 मध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे काय दर होते? आणि आता 2018 मध्ये दर किती वाढले आहत? हे दाखवत सेनेनं भाजपच्या अच्छे दिनची खिल्ली उडवली आहे.

'यही है अच्छे दिन'! सेनेचा भाजपवर बाण
SHARES

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ रोज एक नवा उच्चाक गाठत आहे. या इंधन दरवाढीनं आणि त्याअनुषंगानं निर्माण झालेल्या महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं आहे. या मुद्द्यावरून केंद्र सरकारला टार्गेट करण्याची संधी विरोधक सोडताना दिसत नाहीत. अशावेळी सत्तेत असूनही भाजपवर नाराज असलेली शिवसेना कसली संधी सोडतेय. सेनेने या संधीचा फायदा घेत भाजपवर बाण सोडला आहे.

WhatsApp Image 2018-09-07 at 08.59.05.jpeg

अच्छे दिनची खिल्ली

युवा सेनेतर्फे संपूर्ण राज्यात आणि मुंबईतील माहीम प्रभादेवीसह अन्य परीसरात 'यही है अच्छे दिन' असे पोस्टर लावण्यात आले आहेत. 2015 मध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे काय दर होते? आणि आता 2018 मध्ये दर किती वाढले आहत? हे दाखवत सेनेनं भाजपच्या अच्छे दिनची खिल्ली उडवली आहे.

WhatsApp Image 2018-09-07 at 08.58.07.jpeg

काँग्रेसही आक्रमक

इंधन दरवाढीवरून काँग्रेसही आक्रमक झाली असून काँग्रेसने 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. त्यात आता सेनेने पोस्टरबाजीतून भाजपला टार्गेट केलं आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा मुद्दा येत्या काळात भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो.

२०१४ साली शिवसेनेसह सर्व नागरिकांनी भाजप सरकारला निवडून दिलं होतं, त्यावेळी भाजप सरकारने अच्छे दिन आयेंगे असा दावा केला होता. पेट्रोल आणि डिझलचे भाव प्रति लीटर ३० रुपये दराने मिळतील, महागाई कमी होईल, डॉलर आणि रुपया समान येणार, असे दावे केले होते. मात्र हे दावे खोटे ठरत असून इंधन दरवाढ, महागाई अशा सर्व गोष्टीमुळे सर्वांची निराशा होताना दिसत आहे. त्यामुळे आम्ही पेट्रोल पंपावर हे होर्डिंग लावले असून त्याद्वारे वस्तुस्थिती मंडण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच अशाप्रकारे महागाई वाढत गेली तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. 

- वरुण सरदेसाई, सचिव, युवसेना


हेही वाचा - 

धाडस असेल तर कदमांवर कारवाई करा, उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

"राम नव्हे रावण" - मनसेची राम कदमांविरोधात पोस्टरबाजी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा