गोरेगावमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचं युनिट

 Goregaon
गोरेगावमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचं युनिट
गोरेगावमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचं युनिट
गोरेगावमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचं युनिट
See all

गोरेगाव - गोरेगाव पूर्व वॉर्ड नं. 54 मध्ये कॉलेजच्या तरुण मुलांनी सहभाग घेऊन भारतीय विद्यार्थी सेनेच्या युनिटची सोमवारी स्थापना केली. शिवसेनेला अजून मजबूत करण्यासाठी सुरू झालेल्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या या युनिटच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवबंधनही बांधण्यात आलं. या वेळी उपविभागप्रमुख शशांक कामत, विद्यार्थी सेना आणि निमंत्रक कालिदास कांदळगावकर उपस्थित होते. कॉलेज, शाळेतल्या मुलांच्या समस्यांवर विद्यार्थी सेना काम करणार आहे, हाच या मागचा उद्देश आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात राजकारणात सहभागी व्हावं. त्यातून समाजात चांगले तरुण तयार होऊ शकतात, असं कांदळगावंकर यांनी सांगितलं.

Loading Comments