Advertisement

शिवसैनिकांनो, निवडणुकीला तयार रहा - उद्धव ठाकरे


शिवसैनिकांनो, निवडणुकीला तयार रहा - उद्धव ठाकरे
SHARES

'निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा', असे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी अचानकपणे मध्यावधीचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील या दोघांनीही नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले आहेत. नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातल्या संभाव्य प्रवेशावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा विरोध हा निरर्थक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मध्यावधीचे संकेत दिले आहेत.शिवसेनेने वाटले ‘घोटाळेबाज भाजप’ नावाचे पुस्तक

फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने मात्र आनंद व्यक्त करण्याऐवजी सरकारविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त ‘घोटाळेबाज भाजप’ नावाची पुस्तिका छापण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘घोटाळेबाज भाजप’ ही पुस्तिका शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिली आहे. पुस्तिकेत भाजपाच्या घोटाळ्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंत्र्यांच्या फोटोसहित घोटाळ्यांची माहिती यात आहे.
हेही वाचा

खरं कोण खोटं कोण? 'त्या' नगरसेवकांवर मनसे, शिवसेना दोघांचाही दावा


संबंधित विषय