शिवसेना नगरसेविकेचा भाजपा खासदारावर राग

  Mumbai
  शिवसेना नगरसेविकेचा भाजपा खासदारावर राग
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढली. पण त्याआधी दोन्ही पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी हातात हात घालून काम करत होते. परंतु महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढताना नेमका याचाच त्रास शिवसेना आणि भाजपाच्या लोकप्रतिनधींना होऊ लागला आहे. खासदार निधीतून म्हाडाच्या वतीने करण्यात आलेल्या विकासकामांबाबत कुर्ला येथील शिवसेनेच्या नगरसेविकेने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  कुर्ला येथील शिवसेनेच्या नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी आपल्या प्रभाग 168 मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केली. परंतु महापालिका एल विभागाच्या सहायक आयुक्तांनी याची योग्य अंमलबजावणी केली नाही. मात्र, दुसरीकडे म्हाडाच्या वतीने पदपथ, रस्ते तसेच मिठी नदीच्या परिसरात सीआरझेड भागातही कामे करण्यात आली आहेत. परंतु याबाबत तक्रारी करूनही महापलिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे जर तक्रारी करूनही प्रशासन कारवाई करत नसेल तर काय कारवाई केली जाणार, असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे. ज्या खासदार निधीतून म्हाडाने ही कामे केली आहेत, त्या अधिकाऱ्यांवर एमआरटीपीअंतर्गत कारवाई करण्याची मागणीही पेडणेकर यांनी केली आहे. दादागिरी करत जबरदस्तीने केलेल्या या कामांचा अहवालही पूर्ण करून आपल्याला दिला जावा, अशी मागणी पेडणेकर यांनी केली. 

  या भागात भाजपाच्या खासदार पूनम महाजन असून त्यांच्या कामाबाबतही पेडणेकर त्रागा व्यक्त करत कामचुकार अधिकाऱ्याला घरी बसवा, अशीच मागणी केली आहे. पेडणेकर यांच्या या हरकतीच्या मुद्दयाला विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी पाठिंबा देत नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणली जात असल्यामुळे या कामांची चौकशी केली जावी, असे सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.