SHARE

शहरी भागातील स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी 5 टक्के तर ग्रामीण भागासाठी 4 टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शिवसेनेने विरोध केला असून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

[हे पण वाचा -  मुंबईकरांनो, आता घरं महागणार ! नोंदणीसाठी जादा रकमेची आकारणी]

यासंदर्भात कदम म्हणाले की, शिवसेनेतर्फे आम्ही गुरुवारी मुख्यमंत्र्यांना भेटून महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मागे घेण्यास सांगणार आहोत. सरकारने निर्णय मागे घेतला नाही, तर सत्तेत असलो तरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे.

याचप्रमाणे बक्षीस पत्राद्वारे वंशजाला मालमत्ता दान केली असेल, तरी अशा मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या 3 टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल. या निर्णयालाही शिवसेनेने विरोध केला आहे. शिवसेनेच्या या पवित्र्यानंतर भाजपाची डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या