Advertisement

मास्क लावण्याचा सल्ला भेंडी बाजारात द्या, मनसेने अस्लम शेख यांना सुनावलं

मास्क न लावल्यास लाॅकडाऊन करावं लागेल, असा इशारा मुंबईकरांना देणारे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी हा सल्ला भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात द्यावा.

मास्क लावण्याचा सल्ला भेंडी बाजारात द्या, मनसेने अस्लम शेख यांना सुनावलं
SHARES

मास्क न लावल्यास लाॅकडाऊन करावं लागेल, असा इशारा मुंबईकरांना देणारे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (aslam sheikh) यांनी हा सल्ला भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात द्यावा, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी त्यांना सुनावलं आहे. 

मुंबईत कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या वाढत असल्याचं मान्य करावं लागेल. आवाहन करूनही लोक ऐकत असल्याने आम्ही कारवाईही सुरू केली आहे. लग्नासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी असूनही प्रत्यक्षात ३०० ते ४०० लोकांना बोलवण्यात येतं. सरकारनं नियमावली ठरवून देऊनही काही रेस्टॉरंटमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश दिला जातो, अशा लोकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाईट क्लबवरही कारवाई सुरू केली आहे. त्यांचे परवाने रद्द केले जातील. सरकार म्हणून जे करणं शक्य आहे, ते आम्ही करतोय. परंतु, पुन्हा लाॅकडाऊन होऊ द्यायचं नसेल तर मुंबईकरांनी मास्क लावला पाहिजे, स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला अस्लम शेख यांनी दिला होता.

हेही वाचा- मुंबईतही लॉकडाऊन होण्याची शक्यता- पालकमंत्री अस्लम शेख

त्यावर ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना, मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख असं म्हणाले की मास्क लावला नाही तर लॉकडाऊन करावा लागेल. आमची त्यांना विनंती आहे की हाच सल्ला त्यांनी जरा भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात पण द्यावा. किमान स्वतःच्या मतदारसंघात एक चक्कर तरी मारावी, या शब्दांत संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी त्यांना सुनावलं आहे.

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनामुळे लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद सादत ८ दिवसांचा वेळ दिला आहे. फेब्रुवारीपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर इमारतींमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. घरातील एक व्यक्ती बाधित झाल्यानंतर कुटुंबातील सर्वांच्या चाचण्या करण्यात येत आहेत.

चाचण्यांच्या अहवालात कुटुंबातील अन्य सदस्यही कोरोनाबाधित असल्याचं आढळून येत आहे. मुंबईतील (mumbai) रुग्णवाढीचा दर डिसेंबरनंतर घसरला होता. तो ०.१२ टक्क्यांवर स्थिर झाला होता. मात्र, हा दर वाढून आता सरासरी ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर काळजीची बाब म्हणजे मुंबईतील काही विभागांमध्ये हा दर ०.३० टक्क्यांच्याही पुढे आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.

(slam sheikh must give mask wearing suggestions at bhendi bazaar to avoid covid 19 says sandeep deshpande)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा