८० टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना १००० रूपये प्रतिमाह अर्थसहाय्य - राजकुमार बडोले

संजय गाधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील ४० टक्के ते ७९ टक्केपर्यंत दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांना ८०० रुपये तर ८० टक्के व अधिक दिव्यांगत्व असलेल्यांना १००० रूपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

SHARE

८० टक्के व अधिक दिव्यांगत्व असलेल्या निराधार व्यक्तींना आता दर महिन्याला १००० रूपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला अाहे. तसंच दिव्यांग लाभार्थ्यासाठी उत्पन्न मर्यादाही २१ हजारावरून ५० हजार रुपये करण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील१ लाख ३५ हजार ५१२दिव्यांगांना मिळणार अाहे. तसंच उत्पन्न मर्यादा वाढवल्यामुळे लाभार्थ्यांची संख्याही वाढणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.


३४ कोटींचा बोजा 

  संजय गाधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील ४० टक्के ते ७९ टक्केपर्यंत दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांना ८०० रुपये तर ८० टक्के व अधिक दिव्यांगत्व असलेल्यांना १००० रूपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पूर्वी अर्थसहाय्याची रक्कम ६०० रूपये होती. अर्थसहाय्यात वाढ केल्यामुळे ३४ कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचं बडोले यांनी सांगितलं.        


३२ लाख लाभार्थी

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अ गट, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ब गट, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, तसंच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, ८० टक्के व अधिक दिव्यांगत्व अशा सर्व गटातील लाभार्थ्यांची एकूण संख्या ३२ लाख ३४ हजार ८९१ आहे.हेही वाचा - 

१५० देशांध्ये खादी पोचवणार - गिरीराज सिंग

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी? आनंदराज आक्रमक, आंदोलनाचा इशारा
संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ