Advertisement

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग, राज्यभरात ‘एसओपी’ लागू करणार

राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग, राज्यभरात ‘एसओपी’ लागू करणार
SHARES

राज्यातील कोविड सेंटरमध्ये (covid19 centers) महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

औरंगाबाद शहरातील कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ही घटना दुर्दैवी असून सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- राठोडांचा राजीनामा अजूनही मुख्यमंत्र्यांच्याच खिशात?

औरंगाबाद शहरातील पदमपुरा भागात असलेल्या कोविड सेंटरमध्ये रात्रीच्या वेळी राऊंडवर असताना डॉक्टरने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेनं आरडाओरड करताच डॉक्टर तिथून फरार झाला. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने चौकशी सुरू केली होती.

कोविड सेंटरमध्ये घडलेल्या घटनेचा मुद्दा बुधवारी विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी यावर निवेदन केलं. पवार म्हणाले, औरंगाबादमधील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या भगिनीसोबत घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे.

सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. विनयभंगाचा प्रयत्न झाल्याच्या भगिनीच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळून आलं आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले.

(sop will apply at all covid centers in maharashtra for women safety says ajit pawar)

हेही वाचा- आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडे यांची मागणी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा