Advertisement

राठोडांचा राजीनामा अजूनही मुख्यमंत्र्यांच्याच खिशात?

संजय राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलेला नसून तांत्रिकदृष्ट्या राठोड अजूनही मंत्रीपदी कायम असल्याचं चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राठोडांचा राजीनामा अजूनही मुख्यमंत्र्यांच्याच खिशात?
SHARES

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात विरोधक भाजपच्या दबावाखाली संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे सुपूर्द केला. परंतु हा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलेला नसून तांत्रिकदृष्ट्या राठोड अजूनही मंत्रीपदी कायम असल्याचं चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात आॅडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होऊ लागले. एवढंच नाही, तर याप्रकरणी चौकशी होऊन सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत संजय राठोड यांना मंत्रीपदावर बसवणं चुकीचं असल्याने त्यांना तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येऊ लागली. जोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपने दिल्यानंतर ठाकरे सरकारवरील दबाव वाढला.

हेही वाचा- आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडे यांची मागणी

अखेर संजय राठोड यांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राठोड यांचा राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतलेला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यावर कार्यवाही होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु प्रत्यक्षात राजीनामा घेऊन २ ते ३ दिवस उलटून गेले, तरीही संजय राठोड यांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे संजय राठोड (sanjay rathod) तांत्रिकदृष्ट्या अजूनही मंत्रीपदी कायम आहेत. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने मुख्यमंत्री महिनाभर तरी हा राजीनामा स्वत: जवळ ठेवून घेऊन शकतात किंवा राठोड यांना दुसरं मंत्रीपदही दिलं जाऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे. 

पक्षाची प्रतिमा बिघडू नये म्हणून संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला असला, तरी शिवसेनेतील काही नेते मात्र या राजीनाम्यावरून नाराज आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा पक्षाने राजीनामा घेतलेला नसताना केवळ राठोड यांचा राजीनामा घेणं, हा समान न्याय नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

(speculation on resignation of maharashtra cabinet minister sanjay rathod is not approved by cm uddhav thackeray)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा