Advertisement

केंद्र, राज्य सरकार शेतकऱ्यांसोबतच गरीबांच्याही विरोधात - चित्रा वाघ


केंद्र, राज्य सरकार शेतकऱ्यांसोबतच गरीबांच्याही विरोधात - चित्रा वाघ
SHARES

राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील गरीबांना रास्त दर असलेल्या दुकानांमधून मिळणाऱ्या साखरेवरील सबसिडी रद्द केल्यामुळे जवळजवळ ४५ लाख कुटुंबांना स्वस्त साखर मिळणे बंद होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात केंद्राने अनुदान बंद केले तरी राज्य सरकार अनुदान देऊन गरीबांना धान्य पुरवठा करत होते.

छत्तीसगडसारखे राज्य जर हे करू शकते, तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही, असा जळजळीत सवाल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकारला विचारला आहे.

एकीकडे मोठ्या उद्योगपतींची हजारो कोटी रुपयांची कर्जे माफ करायची आणि दुसरीकडे गरीबांच्या तोंडचा घास हिसकवायचा, हा कोणता न्याय? शेतकऱ्यांसाठी तर हे सरकार काही करू शकलेले नाहीच पण आता गरीबांच्याही हिताविरूद्ध यांची कारवाई सुरू आहे. यावरून हे सरकार शेतकरीविरोधी तर आहेच, पण गरीबांच्याही विरोधातले आहे, हे आता स्पष्ट झाले, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

त्याचसोबत, सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असलेल्या म्हाडाच्या योजनेचे भाजपा सरकारने प्रकाश मेहता नामक नामांकित बिल्डरला गृहनिर्माण खाते देऊन व्यावसायिकीकरण केले असल्याचा आरोपही वाघ यांनी केला. परवडणारी घरे अपेक्षित असताना आज या योजनेत दोन कोटी रुपयांना घरे विकली जात असून त्यामुळे सामान्य गृहिणींच्या स्वप्नांना सुरूंग लावण्याचे काम हे सरकार करत आहे. एकेकाळी सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाचा आता सर्वसामान्यांशी काही संबंध राहिला नाही, अशी खंत वाघ यांनी व्यक्त केली.

याप्रकारच्या निर्णयांमुळे हे मात्र स्पष्ट होते की या सरकारची प्राथमिकता लोककल्याण नसून आपली तिजोरी भरणे ही आहे. या निर्णयांचा सरकारने लवकरात लवकर पुनर्विचार करावा, नाहीतर सामान्य जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.



हेही वाचा - 

महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा