Advertisement

राज्य मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार?

फडणवीस सरकारची मुदत आणखी एक वर्ष आहे. त्याआधी मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकाही अपेक्षित आहेत. अशावेळी मंत्रिमंडळाचा हा विस्तार व खांदेपालट अखेरचा ठरण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार?
SHARES

अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या अखेरच्या विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता अाहे. येत्या शनिवारी म्हणजेच १३ ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार असून विधानभवनात हा कार्यक्रम होणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.


विस्तार अखेरचा

गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होत आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्या २५ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्री आहेत. त्यात शिवसेनेच्या पाच कॅबिनेट तर सात राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा अजूनही भरायची आहे. तर भाजपाच्या तीन जागा रिक्त अाहेत. फडणवीस सरकारची मुदत आणखी एक वर्ष आहे. त्याआधी मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकाही अपेक्षित आहेत. अशावेळी मंत्रिमंडळाचा हा विस्तार व खांदेपालट अखेरचा ठरण्याची शक्यता आहे. रविवारीच मुख्यमंत्री राजधानी दिल्लीत गेले होते. तेथे त्यांनी पक्षाच्या काही नेत्यांशी चर्चा केल्याचं कळतं.


मंत्रिपरिषदेची बैठक 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. फडणवीस यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत तीन वेळा मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. दोन वर्षांनंतर ही बैठक होत आहेत. एरव्ही दर आठवड्याला मंत्रिमंडळाची बैठक होते. मात्र, यात राज्यमंत्र्यांचा समावेश नसतो. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यामुळे या बैठकीला महत्त्व आलं आहे. हेही वाचा - 

व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार

उदयनराजेंना स्वाभिमान आणि आरपीआयकडून आवताण!
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा