Advertisement

माझ्यावर आरोप करणाऱ्याचे श्राद्ध घातले - वायकर


माझ्यावर आरोप करणाऱ्याचे श्राद्ध घातले - वायकर
SHARES

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांचे श्राद्ध घातले, अशा शब्दांत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी निरुपम यांच्यावर टीका केली. आरे येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणात लोकायुक्तांनी वायकर यांच्यावर कारवाई न करण्याचा निर्णय गुरुवारी दिला होता. त्यानंतर शुक्रवारी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना वायकर निरुपम यांच्यावर चांगलेच बरसले.


वायकर असेही म्हणाले -

  • आमदार निधीतून आरेत व्यायामशाळा बांधली
  • बांधकामप्रकरणी कायद्याचे उल्लंघन नाही
  • कागदपत्रांच्या आधारे सिद्ध झाले
  • निरुपम यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले
  • मी त्यांच्यावर १० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार
  • लोकायुक्तांनी माझ्या बाजूने निकाल दिला
  • त्यामुळे निरुपम यांना धक्का बसला असेल
  • त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्याची आवश्यकता
  • निर्णय मान्य नसेल, तर हायकोर्टात जा
  • निरुपम यांच्यामुळेच काँग्रेसची पडझड
  • निरुपम यांनी माझी ९०० कोटींची संपत्ती दाखवावी
  • मी त्यांना दलाली देईन


काय आहे प्रकरण?

वायकर यांनी आरे कॉलनीत अनधिकृतपणे जीमचे बांधकाम केल्याचा आरोप करत निरुपम यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. मात्र राज्याचे मुख्य लोकायुक्त एम. एल. तहलियानी यांनी या प्रकरणाचा निकाल गुरुवारी सुनावला. सादर केलेल्या कागदपत्रांतून वायकर यांनी अतिक्रमण केल्याचे अथवा मंत्रीपदाचा दुरुपयोग केल्याचे आढळून येत नसल्यामुळे वायकर यांच्याविरोधात कारवाई न करण्याचा निर्णय लोकायुक्तांनी दिला. यावर निरुपम यांनी लोकायुक्तांचा निर्णय धक्कादायक असल्याचे सांगत वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले.



हेही वाचा -

भाडेतत्वावरील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा