Advertisement

शासकीय वसतिगृहांना मिळालं 'हे' नवं नाव

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय वसतिगृहांना मिळालं 'हे' नवं नाव
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य सरकारनं सर्व शासकीय महाविद्यालयीन वसतिगृहांचे नामकरण 'मातोश्री' शासकीय वसतिगृह असं करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याच्या आधारे शासकीय ठराव (GR) देखील प्रसिद्ध करण्यात आला.

या निर्णयानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण हा निर्णय शिवसेनेचे नेते, मुख्यमंत्री आणि शिक्षण विभागाचे प्रमुख मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे.

अहवालात असं सांगितलं गेलं आहे की, मुख्यमंत्र्यांनी सर्व अज्ञात सरकारी वसतिगृहांचे नाव बदलून आता मातोश्री वसतिगृहे म्हणून केले आहे. शिवाय, हे नाव महाराष्ट्रातील शासकीय महाविद्यालयांमध्ये आगामी सर्व वसतिगृहांसाठी देखील वापरले जाईल.

जीआरमध्ये सांगितलं की, वसतिगृहांमध्ये तिथल्या रहिवासी विद्यार्थ्यांना आईसारखी देखभाल आणि वातावरण दिले जाते. त्यामुळे भावनिक भावना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला.



हेही वाचा

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न झाले नाहीत- चंद्रकांत पाटील

कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम की..?, मनसेचा खोचक सवाल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा