Advertisement

शरद पवार यांच्या पॅनलला हरवलं, गुणरत्न सदावर्ते यांची निवडणुकीत जोरदार बाजी

स्टेट कर्मचारी संघटना ही राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुरस्कृत मानली जाते.

शरद पवार यांच्या पॅनलला हरवलं, गुणरत्न सदावर्ते यांची निवडणुकीत जोरदार बाजी
SHARES

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटीव्ह बँक निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला सर्वच जागावर विजय मिळालाय. गेल्या 15 वर्षांपासून या बँकेवर स्टेट कर्मचारी संघटनेचे वर्चस्व होते.

स्टेट कर्मचारी संघटना ही राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुरस्कृत मानली जाते. एसटी विलीनीकरण आंदोलनातून एन्ट्री करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंनी आता स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटीव्ह बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केलंय.

एसटी विलिनीकरणाच्या आंदोलनातून एसटी आंदोलनात उडी घेणारे निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते हे पहिल्यांदाच बँकेच्या निवडणुकीला सामोरे गेले. त्यांच्याकडून एसटी स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप बँकेची निवडणूक लढवण्यात आली.

विशेष म्हणजे या निवडणुकीत सदावर्ते पॅनलला दणदणीत असा सर्व 19 जागांवर विजय मिळालाय.

स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात पॅनलचे 150 हून अधिक उमेदवार आपलं नशीब आजमावत होते. निवडणुकीत उतरलेल्या एसटीतील सर्वच संघटनांकडून महाराष्ट्रभर जोरदार प्रचार करण्यात आला.

मात्र, खरी चुरस गुणरत्न सदावर्ते पॅनल आणि शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये बघायला मिळाली.

जवळपास 15 वर्षांपासून कामगार संघटनेचं स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप बँकेवर वर्चस्व होतं. मात्र, एसटी आंदोलनानंतर या बँक निवडणुकीला एक वेगळी दिशा मिळाली.



हेही वाचा

ठाकरे गटाचे 'हे' नेते अडचणीत, अनिल परब यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

पाणी साचल्याने मुंबईकर त्रस्त, मुख्यमंत्री म्हणतात “अरे बाबा स्वागत करा तक्रार काय…”

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा