दादर - 1000-500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या आणि एकच खळबळ उडाली. काहींनी या निर्णयाचं कौतुक केलं तर काहीनी नाराजी व्यक्त केलीय. माहिम परिसरात राहणाऱ्या साधना महाशब्दे यांना या काळात मोठ्या प्रमाणात काटकसर करत घर चालवावं लागलं. तर दादरमधील पुळेकर या कुटुंबालाही 1000-500 रुपयांच्या नोटा बंद झाल्याचा फटका काही प्रमाणात बसला. मात्र त्यांनी मोदींचा निर्णय योग्य असल्याचं सांगत निर्णयाला समर्थन दिलंय. एवढच नाहीतर दादरमधील गरीब कुटुंबातील गंगाधर बामणे त्रास झाला असला तरी भविष्यात याचा फायदा आम्हालाच होईल असं सांगत मोदींच कौतुक केलंय.