कोकण को-ऑपरेटिव्ह बँकेच्या डेबिट कार्डचे अनावरण

 Sewri

See all

परळ - आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रलच्या सभागृहात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते कोकण को - ऑपरेटिव्ह बँकेच्या डेबिट कार्डचं अनावरण करण्यात आले. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड, बँक संचालक नझिम मुल्ला, शकील काझी आदी मान्यवर उपस्थित होते. को- ऑपरेटिव्ह बँक म्हणजे व्यवसाय नसून एक सामाजिक माध्यम आहे. त्यामुळे को- ऑपरेटिव्ह सोसायट्या जगल्या पाहिजेत, म्हणजे सर्वसामान्य माणूस जगेल असं मत सुळे यांनी व्यक्त केलं. बँका इतरांना कर्ज देतात, मात्र सरकारकडून तितक्या प्रमाणात बँकांना न्याय मिळत नाही. एक समाजप्रतिनिधी म्हणून आणि नैतिक जबादारी समजून केंद्र सरकार वा रिझर्व्ह बँकेकडे तुमच्या मागण्या मांडू, सर्व पक्षांना एकत्र आणून त्या सोडवण्याचाही प्रयत्न करू, असं आश्वासनही सुळे यांनी दिलं.

Loading Comments