Advertisement

शरद पवारांवर अजून एक शस्त्रक्रिया होणार

पवार यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शरद पवारांवर अजून एक शस्त्रक्रिया होणार
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर मंगळवारी उशीरा रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. पवार यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पवारांच्या तब्येतीविषयी माहिती दिली.

शरद पवार यांना सोमवारी पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्यांना गॉल ब्लँडर म्हणजेच पित्ताशयातील खड्यांचा त्रास होत असल्याचं समोर आलं होतं. त्यानुसार बुधवारी रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचं देखील ठरवण्यात आलं होतं. मात्र शरद पवार यांना मंगळवारी अधिक त्रास जाणवू लागल्याने त्याच रात्री उशीरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.  

हेही वाचा- “राज ठाकरेच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार, बाकी भूमिपूजन वगैरे…”

यासंदर्भात माहिती देताना राजेश टोपे (rajesh topeयांनी सांगितलं की, शस्त्रक्रियेनंतर शरद पवारांना होणारा त्रास आता थांबला आहे. त्यांची प्रकृती देखील चांगली असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रकृतीत सुधारणा झाल्यास त्यांना पुढील ४ ते ५ दिवसांत डिस्चार्ज मिळू शकेल. त्यांच्यावर पुन्हा एक शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. ही शस्त्रक्रिया लगेच किंवा १० दिवसांनी करण्यात येऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

सोबतच शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सकाळी शरद पवार यांचा फोटो ट्विट केला. सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत, अशी माहिती दिली.

(surgery done on ncp chief sharad pawar in breach candy hospital)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा