'आमीर खान, भाजपा आणि मुंबई फर्स्टवर कारवाई करा'

 Mumbai
'आमीर खान, भाजपा आणि मुंबई फर्स्टवर कारवाई करा'
'आमीर खान, भाजपा आणि मुंबई फर्स्टवर कारवाई करा'
See all

मुंबई - मतदानादिवशी भाजपाने वृत्तपत्रातून प्रसिद्ध केलेल्या मुंबई फर्स्ट या सामाजिक संस्थेच्या जाहीरातीत पारदर्शक आणि बदल या मुद्यांवर मतदान करा असं आवाहन केलं होतं. त्यामुळे मुंबई फर्स्ट या सामाजिक संस्थेचा संबंध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

जाहीराती देऊन आमीर खान, मुंबई फर्स्ट आणि भाजपाने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तर, याविषयी जे.एस.सहारिया यांनी अशा पद्धतीची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आल्याचं सांगितलं. तसंच तक्रारीतील मुद्द्यांचा अभ्यास करुन पुढील कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.

Loading Comments