Advertisement

“गरीबांना उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करा”

गरीबांना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांच्या विश्वस्त अथवा कार्यकारी मंडळाच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

“गरीबांना उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करा”
SHARES

कोरोना महामारी काळात राज्यातील गोरगरीब रुग्णांवर मोफत आणि अर्ध्या खर्चात उपचार करुन त्यांना दिलासा देण्याचे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत. असं असूनसुद्धा अनेक धर्मादाय खाजगी रुग्णालये अशा रुग्णांना दाखल करुन घेत नाहीत तसंच वाढीव उपचार खर्च देखील आकारत आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा रुग्णालयांच्या विश्वस्त अथवा कार्यकारी मंडळाच्या विरोधात  कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. (take strict action against charitable hospitals in maharashtra who denying treatment to poor patients orders vidhan sabha president nana patole)

राज्यातील धर्मादाय खाजगी रुग्णालयांसंबंधी आढावा बैठक विधानभवन, मुंबई इथं नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

धर्मदाय रुग्णालयांकडून नियमांचं होणारं उल्लंघन तसंच गोरगरीबांच्या आरोग्य उपचाराकरिताची महात्मा फुले जन आरोग्य योजना आणखी सक्षमपणे राबविण्यासाठीच्या योजना, या संदर्भातील सुस्पष्ट अहवाल विधी व न्याय विभागाने व धर्मादाय आयुक्त यांनी येत्या ८ दिवसाच्या आत सादर करावा असे आदेश देखील नाना पटोले यांनी दिले.

हेही वाचा - कोरोना लशीच्या मानवी चाचणीला केईम रुग्णालयात सुरुवात

यासंदर्भात आवश्यकता वाटल्यास आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात योजनेच्या आणखी प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी शासनास निर्देश दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

वार्षिक उत्पन्न ८५००० रुपयांपेक्षा अधिक नसेल अशा निर्धन व्यक्ती आणि वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार पेक्षा अधिक नसेल अशी समाजातील दुर्बल घटकातील व्यक्ती यांच्यासाठी उपरोक्त योजनेंतर्गत उपचार देणं धर्मादाय खाजगी रुग्णालयांना बंधनकारक आहे.  मात्र अशा प्रवर्गातील अनेक रुग्णांना बऱ्याचदा रुग्णालयात दाखल करुन घेतलं जात नाही.  तसंच त्यांच्याकडून वाढीव दर आकारला जातो. महाराष्ट्रात असे एकूण ४३५ धर्मादाय रुग्णालये आहेत. 

अत्यवस्थ रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपचार मिळविण्यासाठी हवालदिल असल्याने रुग्णालयांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत. या संदर्भात अन्य त्रयस्थाने केलेली तक्रार देखील ग्राह्य धरण्यात यावी, रुग्णालयाच्या विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य प्रतिष्ठित व्यक्तींची समिती स्थापन करुन त्यामार्फत अशा रुग्णालयांवर देखरेख व नियंत्रण ठेवणं, गोरगरीब रुग्णांसाठी उपलब्ध खाटा व रुग्णालयांची नावे यांचा अद्ययावत माहिती फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणं तसंच कोणालाही सहज समजेल व हाताळता येईल, नाव नोंदवता येईल अशा मोबाईल ॲपची निर्मिती करणं आदी महत्त्वाच्या सूचना यावेळी याबैठकीत मांडण्यात आल्या.

हेही वाचा - खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी रुग्णालयांच्या दुपटीहून अधिक ऑक्सिजनचा वापर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा