मातोश्री 2चे बांधकाम सुरू

 Kalanagar
मातोश्री 2चे बांधकाम सुरू

वांद्रे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या वांद्र्याच्या कलानगरमधील मातोश्रीमध्ये राहतात. मात्र या मातोश्रीच्या हाकेच्या अंतरावर मातोश्री 2 चे बांधकाम सध्या सुरु आहे. या प्लॉटवर नवीन सहा मजली इमारत होणार आहे. नव्याने तयार होणारी इमारत जवळपास 10 हजार स्क्वेअर फूट जागेवर बांधण्यात येत आहे. प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच बेडरुम, एक स्टडी रुम, असं स्ट्रक्चर असणार आहे. प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी तलाटी अँड पंथकी हे बांधकाम करणार आहे. या जागेवर पूर्वी कलाकार केके हेब्बार राहत होते. 1996 साली त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुशीला यांनी त्या जागेचा हक्क घेतला. 2007 साली सुशीला यांच्या मुलांनी ही जागा प्लॅटिनम इंफ्रास्ट्रक्चरला 3.5 कोटी रुपयांमध्ये विकली. या जागेवर सुरुवातीला आठ मजली इमारत बांधण्याची परवानगी काढली होती, असं ‘मुंबई मिरर’च्या वृत्तात म्हटलं आहे. जागेची खरेदी करताना ठाकरे कुटुंबियांनी 5.8 कोटी रुपये प्लॅटिनमला दिले, तर 5.8 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले. 58 लाख रुपये रजिस्ट्रेशन करण्यासाठी भरले आहेत. लवकरच ठाकरे कुटुंबिय नवीन मातोश्रीमध्ये असणार आहेत.

Loading Comments