Advertisement

अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारणार, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.

अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारणार, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा
SHARES

अयोध्यामध्ये महाराष्ट्र सदनाची मागणी महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आली आहे. अयोध्यामध्ये 100 खोल्यांचे महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी योगी सरकारनं जागा सुचवावी. अशी माहिती अयोध्येत दर्शनासाठी गेलेले पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.

आदित्य ठाकरे म्हणाल की, अयोध्येत महाराष्ट्र सदनसाठी जागा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पत्र व्यवहार करणार. महाराष्ट्रातून अयोध्येत येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. तसंच मंदिर सर्वांसाठी खुले झाल्यास महाराष्ट्रातून बरेच नागरिक दर्शनासाठी येतील. त्यासाठी अयोध्येत महाराष्ट्र सदनाचा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे.

ते पुढे म्हणाले की, अयोध्यामध्ये आम्ही राजकारण करण्यासाठी आलो नाही तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत. या ठिकाणी राजकीय विषय काढणं उचित नसेल. आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे, त्यामुळे अयोध्येला आम्ही राजकारणासाठी आलो नाही तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत असं राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असून ते श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय

दोन वर्षांनंतर अयोध्या दौऱ्यावर आलो आहे, उत्साह तोच आहे. माझ्यासोबत सर्व शिवसैनिक आले आहेत. इथे आम्ही राजकारण करायला आलो नाही, आम्ही तिर्थयात्रेला आलो आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. नाशिकहून ट्रेनने निघालेले हजारो शिवसैनिक तब्बल ३५ तासांनंतर आज पहाटे अयोध्येत पोहोचले आहेत.

अयोध्या स्थानकात पोहोचताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह काही शिवसेना नेते आणि पदाधिकारी अयोध्येत दाखल झाले आहेत.

स्थानिक शिवसेना नेत्यांसोबत त्यांच्याकडून आदित्य यांच्या दौऱ्याची तयारी केली जात आहे. मंगळवार रात्री काही शिवसेना नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून या दौऱ्याच्य तयारीच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली आहे. अयोध्येत आदित्य यांच्या दौऱ्याची होर्डिंग्स लावण्यात आली आहेत.



हेही वाचा

देहूतल्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान - सुप्रिया सुळे

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं ब्रृजभूषण सिंह यांच्याकडून स्वागत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा