Advertisement

नव्या नोटांवरून राजकारण


SHARES

मुंबई - अब की बार मोदी सरकारचा नारा देत भाजपा लोकसभा आणि विधानसभेत सत्तारूढ झाला. पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी देशासाठी काही तरी करतील असं अनेकांना वाटत होतं आणि मोदींनी मंगळवारी रात्री ते करून दाखवलं. मंगळवारी रात्री काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदींनी असा सर्जिकल स्ट्राइक केला की, भल्याभल्यांची झोप उडालीय. मोंदींनी कुणालाही काहीच कळू न देता या टाकलेल्या बॉम्बमुळे सर्वसामान्यांना थोडा त्रास झालाय. मात्र देशाच्या आर्थिक फायद्यासाठीच हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया भाजपाकडून देण्यात आलीय. एकीकडे मोदी सरकारनं देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेय... तर दुसरीकडे विरोधक मात्र टीका करतायत असंच चित्र पाहायला मिळतंय. मोदींच्या या निर्णयानं येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकी आधीच बऱ्याच जणांचं धाबं दणाणलं, हे मात्र नक्की...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement