शुक्रवारपासून महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवार १३ सप्टेंबर पासून सुरूवात होत आहे. या यात्रेचा समारोप गुरूवार १९ सप्टेंबर रोजी नाशिक इथं होईल.

SHARE

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवार १३ सप्टेंबर पासून सुरूवात होत आहे. या यात्रेचा समारोप गुरूवार १९ सप्टेंबर रोजी नाशिक इथं होईल. 

मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या दोन टप्प्यात राज्यातल्या २४ जिल्ह्यातील १०६ मतदारसंघात जाऊन निवडणुकीआधीची वातावरणनिर्मिती केली. या यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी २२०८ किमीचा प्रवास केला. त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील यात्रेचा समारोप सोलापूर इथं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झाला होता. तर तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री १३ जिल्ह्यातील ६० विधानसभा मतदारसंघातून १,५२८ कि. मी. चा प्रवास करणार आहेत. 

त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यातून त्यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. तर नाशिकला १९ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व महाजनादेश यात्राप्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.हेही वाचा-

आदित्य ठाकरेंसाठी ग्रामीण भागातील मतदारसंघाची चाचपणी?

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब?संबंधित विषय
ताज्या बातम्या