दहिसरच्या प्रभाग तीनमध्ये काँग्रेसमध्येच बंडखोरी


SHARE

दहिसर - पालिका निवडणुकीसाठी सोमवारी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. अनेक वर्षांपासून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांचे तिकीट कापले गेल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याच्या विरोधात आता अनेक निष्ठावंत इच्छुक उमेदवारांनी अधिकृत उमेदवारांविरोधातच अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याने अधिकृत उमेदवारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित जागा मानल्या जाणाऱ्या दहिसरच्या प्रभाग तीनमध्येच पक्षाच्या अंतर्गतच बंडखोरी सुरू आहे.

इथे 10 वर्षे काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले दिवंगत राजेंद्र प्रसाद चौबे यांचे पुत्र अभय चौबे यांना तिकीट देण्यात आले आहे. येथे चौथी प्रसाद गुप्ता आणि ब्लॉक अध्यक्ष प्रदीप नायर हे देखील काँग्रेसमधील प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र पक्षात तिकीट न मिळाल्याने दोघे बंडखोरी करत निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. चौथी प्रसाद गुप्ता यांनी आरोप केला आहे की, 25 वर्षांपर्यंत पक्षाची सेवा केल्यानंतरही तिकीट न देऊन काँग्रेस पक्षाने विश्वासघात केला आहे. पण जर या दोघांनी पक्षाच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्यास काँग्रेसला नुकसान पोहचू शकते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या