Advertisement

उदयनराजे भडकले, म्हणाले मी चक्रम आहे, पण जनतेसाठी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी बैठक बोलवली होती. परंतु या बैठकीतून उदयनराजे तडकाफडकी बाहेर पडले. पिसाळलेल्यांना आवरा नाहीतर, पक्षात मी राहील किंवा रामराजे राहतील, असा अल्टिमेट दिला.

उदयनराजे भडकले, म्हणाले मी चक्रम आहे, पण जनतेसाठी...
SHARES

इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून खासदार उदयनाराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद लवकर शमण्याची चिन्हे नाहीत. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी बैठक बोलवली होती. परंतु ही बैठकही निष्फळ ठरली. या बैठकीतून उदयनराजे तडकाफडकी बाहेर पडले. पिसाळलेल्यांना आवरा नाहीतर, पक्षात मी राहील किंवा रामराजे राहतील, असा अल्टिमेटमच त्यांनी पवार यांना दिला.

नेमकं प्रकरण काय?

नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून सध्या राजकारण तापलेलं आहे. उदयनराजे यांनी बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून रामराजे नाईक निंबाळकरवर नेहमीच टीका केली आहे. त्यातच काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी १४ वर्षे बारामतीला पाणी वळवलं. जमिनी लाटण्यासाठी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप उदयनराजेंनी  रामराजेंचं नाव न घेता केला होता. 

उदयनराजेंवर टीका

या आरोपांना उत्तर देताना साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामराजे म्हणाले की, ‘कोणी कोणाचं पाणी पळविलेलं नाही, मी पाण्याचं कधीही राजकारण केलं नाही. तरीही, आमचे स्वयंघोषित छत्रपती खासदार उदयनराजे भोसले काही चक्रमांना घेऊन माझ्यावर भलते सलते आरोप करत आहेत. त्यांना आवरा नाहीतर पक्षातून बाहेर पडू.’ असा इशारा दिला.  

पवारांची मध्यस्ती

ही टीका सहन न झाल्याने उदयनराजेंच्या समर्थकांनी साताऱ्यात रामराजे नाईक-निंबाळकर यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला. हा वाद शिगेला पोहचल्याने पवार यांनी दोघांची समजूत घालण्यासाठी शनिवारी मुंबईत बैठक बोलवली होती. या बैठकीत दोघेही उपस्थित राहीले असले, तरी मतभेद उफाळून आल्याने उदयनराजे बैठकीतून बाहेर पडले.  

होय मी चक्रम

त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, रामराजेंनी माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. मला स्वयंघोषीत छत्रपती, चक्रम म्हणाले. परंतु मी काही स्वयंघोषीत छत्रपती नाही, तर लोकांनी त्यांच्या मनात मला स्थान दिलं आहे. छत्रपतींच्या घराण्याचा मी कधीही वैयक्तिक स्वार्थ्यासाठी वापर केलेला नाही. तसंच लोकांवर अन्याय होत असेलं तर मी चक्रम होतो. कारण मला अन्याय सहन होत नाही. तेव्हा माझ्या पक्षातल्या लोकांवरही टीका करतो. त्याला घरचा आहे असं म्हणतात.  

तुम्ही सभापती आहात, तर तसे वागा. तुम्ही वयाने मोठे आहात म्हणून मी शांत आहे. नाहीतर मला अशा भाषेत बोलणाऱ्याची जीभ हासडली असती. रामराजेंचा उल्लेख पिसाळलेला कुत्रा करताना बरं झालं मी बैठकीतून बाहेर पडलो नाहीतर, हे कुत्रं मलाही चावलं असतं, अशा शब्दांत उदयनराजेंनी रामराजेंवर पलटवार केला.



हेही वाचा-

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणाला डच्चू, कुणाला मिळणार संधी?

राज ठाकरेंनी कापला ५१ किलोचा ईव्हीएम केक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा