Advertisement

अंधेरी पूल दुर्घटना : उद्धव यांच्याकडून महापौरांची पाठराखण

ल्वे मार्गावरील पूल दुरुस्तीसाठी किंवा नवीन पूल बांधण्यासाठी ‘निधी नाही’ अशी नकारघंटा भाजपाने वाजवूच नये. पुलांच्या ऑडिटचे अहवाल धूळ खात पडणार नाही, ही खबरदारी आणि जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महापौरांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.

अंधेरी पूल दुर्घटना : उद्धव यांच्याकडून महापौरांची पाठराखण
SHARES

अंधेरी स्थानकाजवळील गोखले पूल सोमवारी कोसळून ५ जण गंभीर जखमी झाले.  या दुर्घटनेमुळे मुंबईकरांचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. पुलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला अाहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गोखले पुलाची देखभाल व जबाबदारीबाबत केलेल्या विधानाचं उद्धव यांनी समर्थन केलं अाहे.

निधी नसल्याची नकारघंटा

बुलेट ट्रेनसाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी एक लाख कोटी रुपयांचं कर्ज केंद्र सरकार आणि ३० ते ३५ हजार कोटी रुपयांचा वाटा महाराष्ट्र सरकार उचलते. मग रेल्वे मार्गावरील पूल दुरुस्तीसाठी किंवा नवीन पूल बांधण्यासाठी ‘निधी नाही’ अशी नकारघंटा भाजपाने वाजवूच नये. पुलांच्या ऑडिटचे अहवाल धूळ खात पडणार नाही, ही खबरदारी आणि जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महापौरांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. रेल्वेने मुंबईतील पुलांचे लेखापरीक्षण, ऑडीट करण्याबरोबर मुंबईसाठी सुरक्षेचे ‘पूल’ कधी उभारणार याचाही विचार करावा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 


जबाबदारी महापालिकेची - न्यायालय

लोकांचे जर जीव जात असेल तर बघ्याची भूमिका घेणार का ? दुर्घटनांची जबाबदारी घेणार की नाही? रेल्वे ही परदेशी संस्था आहे का ? हद्दीचा प्रश्न निर्माण कसा होतो ?, असे प्रश्न उपस्थित करीत मुंबईतील नागरिकांशी निगडीत कोणत्याही पायाभूत सुविधेबाबत दुर्घटना घडल्यास जबाबदारी मुंबई महापालिकेचीच राहील, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पालिकेला सुनावलं आहे. 



हेही वाचा - 

बेरोजगारांसाठी खूशखबर : ३६ हजार जागांसाठी लवकरच जाहिरात

विधानपरिषदेसाठी भाजपाकडून महादेव जानकरांना पुन्हा संधी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा