गृहमंत्रालयाचा कारभार स्वतंत्र असावा

  Churchgate
  गृहमंत्रालयाचा कारभार स्वतंत्र असावा
  मुंबई  -  

  "गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवर होणारे हल्ले वाढलेत. साहजिकच गृहमंत्रालयाची जबाबदारीही वाढलीय. सध्या गृहमंत्रालयाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. पण त्यांच्यावरील कामाचा व्याप मोठा आहे. त्यामुळं गृहमंत्रालयाचा कारभार स्वतंत्र असावा", असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रीपद सोडण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिलाय. 

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पोलीसांच्या कुटुंबीयांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी पोलिसांवर होणारे हल्ले रोखले जावेत यासाठी उपाययोजना व्हाव्यात, पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवला जावा, पोलिसांच्या कामाचे तास कमी केले जावेत, अशा मागण्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या.  
   यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांची बाजू मुख्यमंत्र्यांसमोर खंबीरपणे मांडली. " पोलिसांवर जो कुणी हल्ला करेल त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आम्ही विरोधी पक्षात असताना ज्या मागण्या केल्या होत्या, त्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यासाठी पोलिसांच्या कुटुंबीयांना समाविष्ट करून एक समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये पोलिसांचे कुटुंबीय, सरकारचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असणार आहेत,'' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.