Advertisement

सर्वाधिक लस मिळूनही महाराष्ट्राची कुरकूर सुरूच- भारती पवार

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक लस पुरवण्यात येत आहेत, तरी कमी लस मिळत असल्याची राज्य सरकारची कुरकूर सुरूच असल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली.

सर्वाधिक लस मिळूनही महाराष्ट्राची कुरकूर सुरूच- भारती पवार
SHARES

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक लस पुरवण्यात येत आहेत, तरी कमी लस मिळत असल्याची राज्य सरकारची कुरकूर सुरूच असल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली. 

भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी पालघरमधून सुरुवात झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या. केंद्रातील भाजप सरकारने आपल्या मागील काही दिवसांमध्ये कुठकुठले जनहिताचे निर्णय घेतले आहेत, लोकांच्या सुविधेसाठी कोणकोणते प्रकल्प राबवण्यात येत आहेत, याविषयी लोकांना अवगत करून देण्यासाठीच आम्ही ही जनआशीर्वाद यात्रा काढत आहोत. सोबतच या यात्रेच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडी सरकारमधील त्रुटी देखील दाखवून देणार आहोत. राज्यातील कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करून अधिक गर्दी होऊ न देता ही यात्रा करणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा- शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन करणाऱ्या एकाला अटक

पालघर, मनोर, चारोटी, तालसरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशी भारती पवार यांची ही जनआशीर्वाद यात्रा जाणार आहे. स्थानिकांना आरोग्यसुविधांना मिळवताना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे हे केंद्रीय मंत्री म्हणून पाहणं आपली जबाबदारी असल्याचं भारती पवार यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. भारती पवार यांच्या  यात्रेमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसंच स्थानिक भाजप पदाधिकारी सहभागी झाले आहेत. 

हेही वाचा- डेल्टा प्लसचा मुंबईत पहिला बळी, महिलेचा मृत्यू


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा