Advertisement

रामदास आठवले बोलले.. म्हणे, चायनीज पदार्थांवर बंदी घाला!

देश आणि राज्यभरातील चायनीज रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थांवर बंदी घालून चीनला धडा शिकवा, असं मत आठवले यांनी मांडलं आहे.

रामदास आठवले बोलले.. म्हणे, चायनीज पदार्थांवर बंदी घाला!
SHARES

सध्या भारत आणि चीन दरम्यान सीमावादावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनने पूर्वनियोजीत कट रचून बेसावध असलेल्या भारतीय जवानांवर हल्ला केला. ज्यात २० हून अधिक भारतीय जवान शहीद झाले. यामुळे संपूर्ण भारतातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काही जण चिनी मालावर बहिष्कार घाला, असं म्हणत आहेत. तर काही जण चीनसोबत थेट आरपारची लढाई करा, असा सल्ला देत आहेत. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं प्रमुख रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale wants ban on Chinese food after India Chine face off in Galwan Valley) यांनी देखील केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. देश आणि राज्यभरातील चायनीज रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थांवर बंदी घालून चीनला धडा शिकवा, असं मत आठवले यांनी मांडलं आहे.

हेही वाचा - भारत-चीन वादामुळं मुंबईतील 'हे' कंत्राटही चीनकडून निसटलं

काय म्हणाले आठवले?

आपल्या ट्विटर हँडरवर टाकलेल्या व्हिडिओद्वारे रामदास आठवले म्हणाले, चीन हा दगाबाज देश आहे. चीनवर कुठल्याही परिस्थितीत भरवसा ठेवता कामा नये. एवढंच नाही, तर गरज पडल्यास चीनसोबत आरपारचं युद्ध करून भारताने त्यांना धडा शिकवला पाहिजे. चीनसोबत भारताचा मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो. चीनला अद्दल घडवायची असल्यास त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या पाहिजेत. त्यासाठी भारताने ताबडतोब चीनसोबतचा व्यापार थांबवला पाहिजे. देशातील व्यापाऱ्यांनी चीनकडून वस्तू आयात करणं थांबवलं पाहिजे. देशातील कुठल्याही व्यक्तीने चीनचा माल खरेदी करता कामा नये, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. चीन विरोधात रिपाइंचं शनिवारी २० जून रोजी महाराष्ट्रात राज्यभर आंदोलन आयोजित केल्याचंही त्यांनी सांगितलं. 

ते पुढं म्हणाले, देशात चायनीज पदार्थांना मोठी मागणी आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात चायनीज रेस्टाॅरंट आहेत. तेव्हा राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातील चायनीज रेस्टाॅरंट बंद केले पाहिजेत. सर्वसामान्य लोकांनीही चायनीज पदार्थांवर बहिष्कार घातला पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

टिकटाॅकचा वापर थांबवा

चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी व्हिडियो अॅप टिकटॉक वर भारतात बंदी आणावी. भारतातील अंदाजे १५ कोटी जनता टिकटाॅक हा अॅप वापरते. ज्यामुळे या चिनी कंपनीला मोठा नफा मिळतो. चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी तमाम देशवासियांनी टिकटॉकवर बहिष्कार टाका, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलं. सोबतच महाराष्ट्र्र सरकारने चिनी कंपन्यांशी केलेला ५ हजार कोटींचा सामंजस्य करार रद्द करण्यात यावा, अशी मागणीही आठवले यांनी केली. 

हेही वाचा - ५०० चीनी उत्पादनांवर CAIT चा बहिष्कार, जाणून घ्या यादी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा