Advertisement

अंतिम निर्णय होईपर्यंत फेरिवाल्यांवर कारवाई नाही- किशोरी पेडणेकर

फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात काही त्रुटी असल्यानं याबाबत कोणताही अंतिम निर्णय होत नाही तो पर्यंत फेरिवाल्यांवर कारवाई होणार नाही आहे.

अंतिम निर्णय होईपर्यंत फेरिवाल्यांवर कारवाई नाही- किशोरी पेडणेकर
SHARES

मुंबईतील फेरिवाल्यांमुळं (Hawkers) चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेकदा त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येते. मात्र, त्यांचं प्रमाणं अद्याप कमी झालेलं नाही. त्यामुळं या फेरिवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी फेरिवाला धोरण तयार करण्यात आलं होतं. मात्र, फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात काही त्रुटी असल्यानं याबाबत कोणताही अंतिम निर्णय (Final Decision) होत नाही तो पर्यंत फेरिवाल्यांवर कारवाई होणार नाही आहे.

फेरीवाला धोरणाबाबत महापालिका सभागृहात सविस्तर चर्चा होऊन अंतिम निर्णय होईपर्यंत प्रशासनानं फेरीवाल्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, असे आदेश महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai mayor Kishori Pednekar) यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

महापालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत (Municipal House Leader Visakha Raut), विरोधी पक्षनेते रवी राजा (Opposition Leader Ravi Raja) यांनी मुंबईतील फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात काही त्रुटी असल्यानं त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी महापालिका सभागृहाची विशेष बैठक बोलावण्याची मागणी महापौर पेडणेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

महापौरांनी येत्या शुक्रवार १३ मार्च रोजी महापालिका सभागृहात धोरणावर चर्चा करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. महापालिका प्रशासनानं सन २०१४ मध्ये मुंबईतील फेरीवाल्यांचं सर्वेक्षण केलं होतं. मात्र, ५ वर्षे होऊनही त्या सर्वेक्षणाबाबत निर्णय झालेला नव्हता व धोरण तयार करण्यात आलेलं नव्हतं. गेल्या वर्षी महापालिकेनं फेरीवाला धोरण तयार केलं.

मात्र, या धोरणाची अंमलबजावणी करताना महापालिकेनं दादरसारख्या (Dadar) ठिकाणी जेथे फेरीवाले बसत नव्हते अशा ठिकाणी फेरीवाल्यांना बसवलं. त्यामुळं त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते. आता पालिका सभागृहात या धोरणावर चर्चा होऊन सर्वानुमते धोरण अंतिम करण्याबाबत निर्णय होणार आहे. मात्र महापौरांनी तोपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नये, असे आदेश दिल्याने फेरीवाल्यांना दिलासा मिळणार आहे.



हेही वाचा -

छत्रपती शिवाजी महाराज पार्क!

मुंबईतील 'या' ठिकाणची हवा अतिवाईट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा