आरक्षणाला माझा विरोध - मीरा कुमार

Mumbai
आरक्षणाला माझा विरोध - मीरा कुमार
आरक्षणाला माझा विरोध - मीरा कुमार
See all
मुंबई  -  

पाच हजार वर्षांपासून देशात चालत आलेल्या आरक्षण व्यवस्थेला माझा विरोध आहे. कपडे धुणारे, मैला वाहणारे आणि चर्मकार या गोष्टी एकाच समाजाने करायच्या, पूजा मात्र विशिष्ट समाजानेच करायची, असे का? आधी हे आरक्षण रद्द करा, मग इतर आरक्षणाकडे आपण वळू, असे 'संपुआ'च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार म्हणाल्या.

संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ)च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार, माजी लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, नारायण राणे, संजय निरुपम, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, धनंजय मुंडे, सपाचे अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई आदी नेते उपस्थित होते.मुंबईत येऊन मला आनंद झाला

मुंबईत येऊन मला आनंद झाला आहे. महाराष्ट्राची स्वतःची महान परंपरा आहे. स्वातंत्र्यासाठीचे आंदोलन आणि त्यानंतर राष्ट्रउभारणीत महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र विकासाच्या शिखरावर पोहोचावा ही माझी इच्छा आहे. सतरा विरोधी पक्षांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मला राष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून घोषित केले. ही विरोधी पक्षांची एकजूट मूल्य आणि तत्त्वांवर आधारीत आहे. ही लढाई दलित विरुद्ध दलित अशी झाली आहे.


आताच जातीची चर्चा का?

आजवर जेव्हा उच्चवर्णीय उमेदवार होते, तेव्हा त्यांच्या गुणांची, अनुभवाची चर्चा झाली. या निवडणुकीत कोविंदजी आणि मी निवडणुकीत उभे आहोत, तर फक्त आमच्या जातीची चर्चा होत आहे, ही बाब योग्य नाही, असेही मीरा कुमार म्हणाल्या.हे देखील वाचा -

ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे, 'राष्ट्रपती' - राज ठाकरेडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.