Advertisement

वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, हे आहेत २२ उमेदवार

एमआयएमने औरंगाबाद आणि सोलापूरमधील त्यांच्या उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली आहे. विशेष म्हणजे वंचितने या दोन जागांवरील उमेदवारी घोषित केलेली नाही.

वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, हे आहेत २२ उमेदवार
SHARES

वंचित बहुजन आघाडीने एमआयएम पाठोपाठ मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे वंचितने ही यादी उमेदवारांच्या जातीसह जाहीर केली आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे, विदर्भ, लातूर, जळगाव, नगरमधील जागांचा यामध्ये समावेश आहे. या यादीत ढीवर, नंदीवाले, काची-राजपूत, छप्परबंद, माना, पटवे-मुस्लिम, माडिया, मनियार आणि भिल्ला आदी वंचित समाजातील उमेदवारांचा समावेश आहे. 

एमआयएमने औरंगाबाद आणि सोलापूरमधील त्यांच्या उमेदवारांची नावे आधीच जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे वंचितने या दोन जागांवरील उमेदवारी घोषित केलेली नाही. त्यामुळे वंचित आणि एमआयएममध्ये आघाडी होण्याची अजून शक्यता आहे. वंचितच्या या यादीत दोन डाॅक्टरांचाही समावेश आहे.



हेही वाचा-

भाजपवर पहिल्यांदाच भ्रष्टाचाराचा मोठा आरोप, काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र पत्रकार परिषद

पवारांनी मला ‘हे’ दिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही- उदयनराजे




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा