Advertisement

Maratha Reservation: “तोपर्यंत मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण…”

जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता असेल, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

Maratha Reservation: “तोपर्यंत मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण…”
SHARES

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिल्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोपतरी प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्र्यांसहीत सर्वच मंत्री बोलत आहेत. परंतु जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता असेल, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. (VBA chief prakash ambedkar reacts on maratha reservation in maharashtra)

मराठा आरक्षणाच्या प्रश्नाावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, राज्यात श्रीमंत आणि गरीब मराठा असा मोठा भेद आहे. त्यामुळेच जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणही मिळणार नाही. महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी ते लढत नाहीत. यापैकी कोणीही आमदार मराठा आरक्षणाच्या बाजूने नाही. परिणामी जातीबरोबर राहायचं की आरक्षणाबरोबर याचा निर्णय गरीब मराठ्यांनी घेतला पाहिजे. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारला पाहिजे, नाहीतर त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं लागेल.  

हेही वाचा - Maratha Reservation : मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबत, आंदोलन करू नका - मुख्यमंत्री

मंदिरं सुरू करण्यासंदर्भात मत व्यक्त करताना, राज्यातच नव्हे, तर देशात धर्माच्या नावाने मोठं अर्थचक्र चालतं. लाॅकडाऊन आणि काेरोनामुळे संकटात सापलेल्या अर्थव्यवस्थेला गतीमान करायचं असेल, तर सर्व धार्मिक स्थळं सुरू झाली पाहिजेत. सरकारला एक लाख कोटींच्या महसुलातली तूट भरून काढायची असेल, यावर निर्णय घ्यावाच लागेल. मंदिरं खुली करण्यासंदर्भात आमचा सरकारशी सातत्याने संवाद सुरू आहे. मंदिरं खुली करण्यासाठी सरकार ‘एसओपी’ तयार करत आहे. एकदा का ही नियमावली-आराखडा तयार झाली की पुढील आठवड्यात मंदिरं खुली करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा संघटनांनी राज्यभरात आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना मराठा बांधवांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मराठा बंधु-भगिनींनो, तुमची बाजू सरकार आक्रमकपणे मांडत आहे, ज्येष्ठ विधीज्ञांसोबत चर्चा करत आहोत. तुम्ही आंदोलनं जरूर करा परंतु कोणाच्या विरोधात? सरकार तर तुमच्यासोबतच आहे. आंदोलनांची आवश्यकता नाही. कारण तुम्हाला न्याय मिळवून देण्यास सरकार वचनबद्ध आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा