Advertisement

“आम्हाला लस १५० रुपयांना मिळायला हवी, नाहीतर…”

केंद्र सरकारला ज्या किंमतीला लस देण्यात येत आहे, त्याच किंमतीला आम्हालाही लस उपलब्ध झाली पाहिजे, नाहीतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

“आम्हाला लस १५० रुपयांना मिळायला हवी, नाहीतर…”
SHARES

कोरोना प्रतिबंधात्मक (coronavirus) लस विकसित करण्यासाठी एकच खर्च येत असताना लशीची विक्री वेगवेगळ्या किंमतींना का करण्यात येत आहे? असा प्रश्न विचारतानाच केंद्र सरकारला ज्या किंमतीला लस देण्यात येत आहे, त्याच किंमतीला आम्हालाही लस उपलब्ध झाली पाहिजे, नाहीतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. यावेळी ते म्हणाले, सीरम इन्स्टिट्युटने नुकतेच आपल्या लशीचे दर जाहीर केले आहेत. या दरांनुसार सीरमकडून कोविशील्ड ही लस केंद्र सरकारला तर राज्य आणि खासगी रुग्णालयांना यापेक्षा जास्त किंमतीना ते विकणार आहेत. लशीच्या निर्मितीसाठी एकसारखाच खर्च येत असताना किंमतीतली ही तफावत कशासाठी? 

एवढंच काय सीरममधून ज्या बाहेरील देशांना लस विकण्यात आली ती ३ ते ५ डाॅलर्सना विकरण्या आली. तर आपल्याला हीच लस जवळपास ८ डाॅलर दराने विकत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ही लस आम्हाला देखील १५० रुपयांना मिळावी. यासाठी आम्ही केंद्र सरकारला आठवड्याभराची मुदत देत आहोत, यावर जर त्यांनी निर्णय घेतला नाही. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करू, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 

हेही वाचा- केंद्राने लस पुरवठ्यात हात आखडता घेऊ नये- राजेश टोपे

सद्यस्थितीत सीरम इन्स्टिट्युटकडून केंद्र सरकारला कोविशील्ड लस १५० रुपयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार केंद्राकडून सर्व राज्यांना या लशीचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस घेण्यास परवानगी देण्यात आली असून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर टाकण्यात आली आहे.

त्यानुसार केंद्राने लस उत्पादक कंपन्यांना आपापले दर जाहीर करण्यास सांगितले आहेत. सीरमने जाहीर केलेल्या दरानुसार केंद्र सरकारला जुन्याच दराने म्हणजे १५० रुपयांना लस देण्यात येईल, तर राज्यांना ४०० आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना लस देण्यात येणार आहे.

कोव्हिशील्ड लशीची आधीची किंमत ‘अ‍ॅडव्हान्स्ड फंडिंग’वर आधारित होती व आता लशीचं उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे, असं सांगत सीरमने किंमत वाढीचं समर्थन केलं.

(VBA chief prakash ambedkar wants covid 19 vaccine in minimum price )


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा