Advertisement

मराठा आरक्षणाची लढाई सर्वांची- उद्धव ठाकरे

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढ्यासाठी काम करावं, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजातील नेत्यांना केलं.

मराठा आरक्षणाची लढाई सर्वांची- उद्धव ठाकरे
SHARES

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढ्यासाठी काम करावं, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मराठा समाजातील नेत्यांना केलं. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुउद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, ज्येष्ठ विधीज्ञ विजयसिंह थोरात, मुख्य सचिव संजय कुमार, शिष्टमंडळासोबत आमदार विनायक मेटे, विनोद पाटील यांच्यासह विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी राज्य शासन सर्वोपतरी प्रयत्न करत आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून प्रयत्न केले पाहिजे.

हेही वाचा- साधं ट्विटरवर संभाजीनगर म्हणू शकत नाही, हे नामांतर काय करणार?

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा आदी उपस्थित होते.

त्याआधी आरक्षणाचा निर्णय हाेत नाही तोपर्यंत राज्य सरकारने कुठलीही सरकारी भरती प्रक्रिया राबवू नये, असं मत शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी मांडलं होतं.

सर्वोच्च न्यायालयाने नवीन कायदेतज्ज्ञांचा समावेश करून पुढील रणनीती ठरवावी. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार काय करणार याबाबत निर्णय घेऊन मराठा समाजातील नेत्यांची बैठक घेऊन त्यांना माहिती द्यावी. सरकारने काहीच हालचाल केली नाही तर आगामी काळातील आंदोलन, रास्ता रोको, धरणे आंदोलन याबाबत निर्णय घेण्यात येईल, असा इशारा देखील मेटे यांनी दिला होता.

(vinayak mete meets maharashtra cm uddhav thackeray on maratha reservation issue)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा