Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही - जयंत पाटील

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही - जयंत पाटील
SHARES

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार मुंबईला पाणी पुरविणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईकरांना पाणी कमी पडणार नसल्याने कोरोनाच्या या संकाटाच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही.  मुंबईची लोकसंख्या अधिक असल्याने मुंबईला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागतो. झोपडपट्टी भागात अनेकदा पाणी मिळत नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळते. मात्र वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडल्याने मुंबईतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.हेही वाचा -

Mumbai Containment Zones : 'ही' आहे मुंबईतील कंटेन्मेंट झोनची यादी

Mumbai Containment Zones : 'ही' आहे मुंबईतील कंटेन्मेंट झोनची यादी
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा