Advertisement

आधी फेरीवाल्यांवर कारवाई, मगच धार्मिक स्थळांवर


आधी फेरीवाल्यांवर कारवाई, मगच धार्मिक स्थळांवर
SHARES

मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांवर महापालिकेच्या कारवाई सुरू असून, सर्वच धार्मिक स्थळांवर सुरू असलेल्या या कारवाईचा तीव्र निषेध महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्याता आला. एकप्रकारे धार्मिक स्थळांवर कारवाई करून समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला आहे. या प्रार्थनास्थळांवर कारवाईची तत्परता दाखवणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फेरीवाले आणि रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का असाही सवाल सर्वपक्षीय सदस्यांनी करत सभेचे कामकाजच तहकूब करत प्रशासनानाचा निषेध नोंदवला.

पवई आयआयटीपार्क येथे 1924 पासून असलेल्या पुरातन हनुमान मंदिरावर केवळ रस्त्यांवर असल्याचे कारण देत कारवाई केली जात असल्याची बाब भाजपाचे नगरसेवक श्रीनिवास त्रिपाटी यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे उपस्थित केली. हे मंदिर जुने असूनही तोडण्यासाठी नोटीस बजावली आहे. मंगळवारी हनुमान जयंती असताना हे मंदिर पाडण्याची प्रक्रीया सुरु केवळ हिंदुंच्या मंदिरावरच कारवाई का केली जात आहे, असा सवाल करत ही कारवाई थांबवली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितल. यावर भाजपाचे मनोज कोटक यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत जर सरसकट सर्वच धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात असेल तर त्याला भाजपाचा विरोध असेल. त्यामुळे महापौरांनी या विषयावर विशेष बैठक बोलावून यावर तोडगा काढावा, अशी सूचना त्यांनी केली. सपाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी हरकतीच्या मुद्दयाचे समर्थन करत मंदिर, मस्जिद, क्रॉस यासह विविध धर्मांच्या प्रार्थना स्थळांवर कारवाई होत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांविरोधातील जर जनता रस्त्यांवर उतरल्यास समाजवादी पक्षही सर्वांसोबत असेल,असे सांगितले. या कारवाईच्या निमित्ताने मुंबईत एकप्रकारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचा आरोप भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी करत जर ही कारवाई सुरू राहिली तर मुंबईत जनक्षोभ माजेल आणि त्या जनक्षोभाला प्रशासनाला सामोरे जावे. त्यामुळे एकप्रकारे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ही सभाच तहकूब करण्यात यावी,अशी मागणी शिंदे यांनी केली. धार्मिक स्थळांवरील ही कारवाई जाणूनबुजून केली केली जात असून, लोकांच्या भावनांशी प्रशासन खेळत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते रविराजा यांनी केला. घाटकोपरमधील एका धार्मिक स्थळांवरील कारवाईसाठी प्रशासनाने आधी नोटीस बजावली. त्यानंतर कागदपत्रे सादर केल्यानंतर ही कारवाई होणार नसल्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले. परंतु आता या अधिकाऱ्याने मंदिरावरील कारवाईसाठी नोटीस बजावली. त्यामुळे एकप्रकारे प्रशासनच गोंधळलेले आहे. त्यामुळे ते संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी केला. परदेशात जर मंदिर बांधली जात आहेत, तर आपण मुंबईतील ही प्रार्थनास्थळे तोडून कशाचे दर्शन घडवत आहोत,असा सवाल प्रशासनाला केला. जर सभागृहात आपण धार्मिक स्थळ वाचवण्यासाठी निर्णय घेऊ शकलो नाही तर आपल्याला या सभागृहात बसवण्याचा अधिकार नाही, असे खडे बोलही माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी सुनावले. प्रशासनातील माणुसकीच संपली असल्याचे सांगत सभागृहनेते यशवंत जाधव प्रत्येक विभागांमधील महापालिकेच्या रडारवर असलेल्या धार्मिक स्थळांचा विचार करायला हवा. यासाठी प्रशासनाची कारवाई तपासण्याची गरज असल्याचे जाधव यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत किशोरी पेडणेकर,शुभदा गुडेकर, जावेद जुनेजा, अतुल शहा,रजनी केणी, विद्यार्थी सिंह, अनिल पाटणकर, अनिल कोकीळ, रिटा मकवाना, रमेश कोरगावकर आदींनी चर्चेत भाग घेत कोणत्याही प्रकारे धार्मिक स्थळांवर कारवाई होऊ नये. सर्व प्रार्थनास्थळे वाचवण्यासाठी महापौरांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करावे,अशी मागणी केली.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हरकतीचा मुद्दा मान्य केल्यामुळे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी प्र प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ही सभाच तहकूब करण्यात यावी,अशी सूचना केली. त्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभेचे कामकाजच तहकूब केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा