Advertisement

आवाज कुणाचा? मराठी नगरसेवकांचाच


आवाज कुणाचा? मराठी नगरसेवकांचाच
SHARES

मुंबई - मुंबईतून मराठी माणूस हद्पार होत असल्याचा दावा केला जात असला तरी अद्यापही मुंबईवर मराठी माणसांची पकड आहे. महापालिका निवडणुकीत यंदा तब्बल 144 मराठी नगरसेवक निवडून आले आहेत. विद्यमान महापालिकेच्या तुलनेत अमराठी नगरसेवकांची संख्या आठ ते दहा टक्क्यांनी वाढली आहे. पण या क्षणापर्यंत तरी मराठी नगरसेवकांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात मुंबईकरांना यश आले आहे.

मुंबई महापालिकेच्या कारभाराची भाषा ही मराठी आहे. त्यातच या निवडणुकीत अमराठी उमेदवारांची संख्या अधिक होती. यंदाच्या निवडणुकीत अमराठी मतदारांनी भरघोस मतदान करत उमेदवारांना निवडून दिले. मात्र, तरीही अमराठी नगरसेवकांच्या संख्येत तेवढ्या प्रमाणात वाढ झालेली नसून या सभागृहात 60 टक्क्यांहून अधिक मराठी नगरसेवक पाठवले आहेत. त्यामुळे या सभागृहात मराठी नगरसेवकांचा आवाज दुमदुमला जाणार आहे.

विद्यमान महापालिकेत 64 अमराठी नगरसेवक आहेत. त्या तुलनेत नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत तब्बल 83 अमराठी नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे यंदा तब्बल आठ ते दहा टक्क्यांनी अमराठी नगरसेवकांचा टक्का वाढलेला पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत भाजपाचे 42, शिवसेनेचे 5, काँग्रेसचे 22, अपक्ष आणि एआयएमआयएम प्रत्येकी 2, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 5 अशाप्रकारे अमराठी नगरसेवक निवडून आले आहेत. विद्यमान महापालिकेत शिवसेना 1, काँग्रेसे 29, भाजपा 12, राष्ट्रवादी काँग्रेस 4, समाजवादी पक्ष 6, अपक्ष 8, रिपाइं 1 आणि नामनिर्देशित सदस्य 3 याप्रकारे 64 अमराठी नगरसेवक आहेत. त्यातुलनेत नव्या महापालिकेत 19 अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली आहे.

गुजराती भाषिक नगरसेवकांची संख्या सर्वाधिक
महापालिकेत अमराठी नगरसेवकांमध्ये गुजराती नगरसेवकांची संख्या सर्वांधिक आहे. निवडून आलेल्या अमराठी भाषिक नगरसेवकांमध्ये गुजराती २८, मुस्लिम २७, उत्तरभारतीय-बिहारी १६, ख्रिश्चन ३, पंजाबी २ आणि दक्षिण भारतीय ५ अमराठी नगरसेवक निवडून आले आहेत.

पक्षनिहाय अमराठी नगरसेवकांची नावे


भाजपा (42)
शिवसेना (5)
काँग्रेस (22)
जगदीश ओझा
संध्या दोषी
राजपती यादव
हरिश पटेल
राजुल पटेल
स्टेफी केनी
जितेंद्र पटेल
रेखा रामवंशी
विरेंद्र चौधरी
विद्यार्थी सिंह
मोहम्म हलीम खान
कमरजहाँ सिद्धीकी
प्रविण शहा
मलीअम्मल तेवर
सलमा अलमेलकर
बिना दोषी

शेख आफ्रिन जावेद
शिवकुमार झा

शाहिदा खान
सुनिता यादव

मेहेर मोहसीन हैदर
सागरसिंह ठाकूर

नाझिया सोफी
लिना पटेल- दहेकर

सुषमा राय
सेजल देसाई

जगदिश कुट्टी
जया सतनाम सिंह तिवाना

विन्नी डिसोझा
दक्षा पटेल

आसिफ झकेरिया
विनोद मिश्रा

तुलिफ मिरांडा
संगीता शर्मा

वाजिद कुरेशी
राम बारोट

अश्रफ आझमी
दीपक ठाकूर

दिलशाद आझमी
हर्ष पटेल

रवीराजा
राजुल देसाई

सुफियान वणू
श्रीकला पिल्ले

बाबू खान
संदीप पटेल

जावेद जुनेजा
सुधा सिंग


रोहन राठोड


रेनू हंसराज


सुनिता मेहता
अपक्ष (2)
एआयएमआयएम (2)
मकवाने अनिष
चंगेझ मुलतानी
गुलनाझ कुरेशी
पंकज यादव
मुमताज रहेबर खान
शेहनवाझ शेख
मुरजी पटेल


केशरबेन मुरजी पटेल


हेतल गाला
सपा (5)
राष्ट्रवादी काँग्रेस (5 )
मनोज कोटक
सायरा खान
ज्योती खान
नील सोमय्या
रुकसाना सिद्धीकी
नादीया शेख
बिंदू त्रिवेदी
आयेशा शेख
सईदा खान
पराग शहा
आयेशाबून खान
कप्तान मलिक
राजेश फुलवारीया
रईस शेख
रेशमबानू खान
कृष्णावेनी रेड्डी


नेहल शहा


मिनल पटेल


ज्योत्स्ना मेहता


अतुल शहा


आकाश पुरोहित


रिटा मकवाना



कमलेश यादव



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा