Advertisement

मोदी सरकारने तोंड उघडण्यास मनाई केलीय का? सुशांतप्रकरणी काँग्रेसचा सीबीआयला सवाल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एम्सचा अहवाल येऊन आता महिना उलटला. तरीही सीबीआयकडून यासंदर्भात अद्याप कुठली प्रतिक्रिया आलेली नाही.

मोदी सरकारने तोंड उघडण्यास मनाई केलीय का? सुशांतप्रकरणी काँग्रेसचा सीबीआयला सवाल
SHARES

सीबीआयवाल्यांनो, इतना सन्नाटा क्यों है भाई? अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एम्सचा अहवाल येऊन आता महिना उलटला. तरीही सीबीआयकडून यासंदर्भात अद्याप कुठली प्रतिक्रिया आलेली नाही, ना कुठल्या कारवाईची माहिती त्यांनी दिली आहे. बिहार निवडणुका होईपर्यंत मोदी सरकारने तोंड उघडण्यास मनाई केली आहे का? असा थेट सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सीबीआयला विचारला आहे.

याबाबत बोलताना सचिन सावंत म्हणाले, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बऱ्याच दिवसांपासून सीबीआयकडून कुठलंही अधिकृत माहिती मिळालेली नाहीय किंवा कुठलीही कारवाई देखील झालेली नाही. एम्सने आपला अहवाल सादर करूनही महिना उलटून गेला आहे. त्यामुळे सहाजिकच आम्हाला सीबीआयला प्रश्न विचारायचा आहे की बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याचं सीबीआय सुशांत सिंह प्रकरणात पालन करत आहे का? की जोपर्यंत बिहार निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत सीबीआयने आपलं ताेंड बंद ठेवावं, असे निर्देश मोदी सरकारने दिले आहेत. निश्चितच यातून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि त्यासाठी सीबीआयचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात आला, हे स्पष्ट होत आहे. (why cbi not giving any updates in sushant singh rajput suicide case asks congress spokesperson sachin sawant)

हेही वाचा- सुशांतच्या खुनाचे आरोपी गजाआड जातील, त्यात एक मंत्री असेल- नारायण राणे

सुशांत सिंह प्रकरणात सीबीआय गप्प असताना दुसरीकडे भाजपकडून अद्यापही महाविकास आघाडी सरकारवर आरोप-प्रत्यारोप करण्याचं थांबलेलं नाही. काही दिवसांपूर्वीच भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारमधील युवा नेत्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले.

हे प्रकरण लपवण्याचा किती प्रयत्न कराल? पोलिसांचा वापर करुन स्वतःच्या मुलाला वाचवणं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. सुशांतला मारलं की त्यानं आत्महत्या केली. यांत कोण कोण सामील होतं. त्याला कशाने मारलं हे तुम्हाला लवकरच कळेल. दिशाच्या मृत्यूचं प्रकरणंही बाहेर येईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अज्ञानात राहू नये.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केलेली नाही, तर तो खूनच आहे. खूनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात एक मंत्रीही असेल आणि तो यांचा मुलगा असेल, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला होता.

हेही वाचा- सुशांत सिंग राजपूत प्रकरणः पुण्यातून चरससह टॅक्सी चालकाला अटक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा