Advertisement

मुंबई काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष?

मुंबई काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सद्यस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड (eknath gaikwad) मुंबई काँग्रेसचे कार्यवाह अध्यक्ष (acting president) आहेत.

मुंबई काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष?
SHARES

मुंबई काँग्रेसमध्ये (Mumbai congress) पुन्हा एकदा हालचाली दिसू लागल्या आहेत. कारण लवकरच मुंबई काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सद्यस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड (eknath gaikwad) मुंबई काँग्रेसचे कार्यवाह अध्यक्ष (acting president) आहेत.

हेही वाचा- यापेक्षा जास्त लोकं लंगरमध्ये जेवतात, ते पण फुकट, ‘शिवथाळी’वरून फडणवीसांचं टीकास्त्र 

सूत्रांच्या मते भाई जगताप (bhai jagatap)आणि चरण सिंह सप्रा(charan singh sapra) मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. तर काहीजण गायकवाड हेच अध्यक्ष राहू शकतात, असं म्हणत आहेत. मुंबईतील मोठे काँग्रेस नेते महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर अध्यक्षपदासाठी दबाव टाकत आहेत. 

मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) २०२२ मध्ये होऊ घातली आहे. त्यासाठी पूर्णवेळ, पूर्ण क्षमतेने काम करणाऱ्या अध्यक्षाची मुंबई काँग्रेसला गरज आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत आलेल्या मल्लिकार्जुन खर्गे(mallikaarjun khadage) यांची भेट घेऊन नवीन अध्यक्षाची नियुक्ती करण्याची मागणी केली. एकेकाळी मुंबई काँग्रेसचा मुंबईमध्ये दबदबा होता. परंतु सद्यस्थितीत काँग्रेसची मुंबईत अवस्था अत्यंत नाजूक आहे. २०१४ च्या मोदी लाटेनंतर मुंबईतील उत्तर भाषिक (North indian) कार्यकर्ता आणि मतदारांनी काँग्रेसचा हात सोडल्याने पक्षाची ही अवस्था झाली.  

हेही वाचा- महाराष्ट्राची एकजूट दाखवा, मुख्यमंत्र्यांचं सर्वपक्षीय खासदारांना आवाहन

खर्गे यांची भेट घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष झाकीर अहमद, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, डॉ. अमरजीत सिंह मन्हास, माजी आमदार बलदेव खोसा, वीरेंद्र उपाध्याय, उपेंद्र दोषी, शिवजी सिंह, राजन भोसले इ. नेत्यांचा समावेश होता. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले दिवंगत गुरुदास कामत यांचे समर्थक मानले जाणारे डॉ. अमरजीत सिंह मन्हास कामत यांच्यासोबतच कृपाशंकर सिंह आणि जनार्दन चांदूरकर यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळा ते पक्षाचे कोषाध्यक्ष होते. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान तिकीट वाटपात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा