बाप्पाही आंदोलनाला बसतात तेव्हा...

 Churchgate
बाप्पाही आंदोलनाला बसतात तेव्हा...
Churchgate, Mumbai  -  

संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच मंत्रालयामध्येही बाप्पा प्रकट झालेत. पण मंत्रालयात बाप्पांचं पूजन करण्यात आलं नसून चक्क बाप्पा आंदोलनाला बसले आहेत. गावपंचायतीनं वाळीत टाकून गावाबाहेर हाकलल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महादेवाचे केरवडे गावातील परमानंद हेवाळेकर व त्यांची पत्नी प्रीतम बाप्पांसोबत आंदोलनाला बसले आहेत. 

हेवाळेकर कुटुंबीय गेल्या तीन वर्षांपासून राहते गाव सोडून पुण्याला मुलीकडं राहत आहेत. गोबर गॅस सब्सिडीचे अतिरिक्त रक्कम दिली नाही म्हणून गावच्या सरपंचांनी 2013 साली हेवाळेकर कुटुंबीयांना गावा बाहेर काढलं. तसंच 2014 ला घरी येऊन धमकी दिल्याचं प्रीतम हेवाळेकर यांनी सांगितलं. गेल्यावर्षी गावक-यांनी आमच्या गणपतीचं विसर्जन केलं. यंदाही आमचा गणपती आम्हाला घरी बसवून न दिल्यानं आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईत आलो, मात्र आज मुख्यमंत्री लवकर निघून गेल्यामुळं आमची भेट झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आज रात्री परमानंद हेवाळेकर हे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सरपंच पंढरीनाथ परब यांची तक्रार करण्यासाठी गेले आहेत. 

Loading Comments