घराच्या समस्यांबाबत जाहीर परिसंवादाचं आयोजन

 Chembur
घराच्या समस्यांबाबत जाहीर परिसंवादाचं आयोजन

टिळकनगर - रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनतर्फे पंचशीलनगर, पेस्तम सागर येथील घरांसंदर्भात उद्भवलेल्या सर्व समस्यांचे कायदेशीर निवारण करण्यासाठी आणि सर्व हाऊसिंग सोसायटीचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नांना कायदेशीर चालना मिळण्यासाठी मंगळवारी जाहीर परिसंवादाचा कार्यक्रम टिळकनगर परिसरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रमेश प्रभू (अध्यक्ष MSWA) , अॅड. संतोष सांजकर , अॅड. वडेर , आर्किटेक्ट भोसले यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं आयोजन अॅड. नितीन निकम आणि मधुरा देसाई यांनी केलं होतं.

Loading Comments