Advertisement

मास्टरलिस्टमधील घरे लाॅटरीतून वगळली!


मास्टरलिस्टमधील घरे लाॅटरीतून वगळली!
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ८१९ घरांसाठी शुक्रवारी जाहिरात प्रसिद्ध झाली. या लाॅटरीतून अखेर मास्टरलिस्टमधील १५३ घरे वगळण्यात आली आहेत. मे मध्ये लाॅटरी काढण्यासाठी मुंबई मंडळाकडे पुरेशी घरे नव्हती. त्यामुळे मास्टरलिस्टमधील घरांचा लाॅटरीत समावेश करत लाॅटरीचा आकडा फुगवण्याचा मुंबई मंडळाचा मागील चार महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू होता.

कायद्यानुसार ही घरे लाॅटरीत घेता येत नसतानाही कायदा धाब्यावर बसवत ही घरे लाॅटरीत घेण्याच्या मुंबई मंडळाच्या प्रयत्नाचा पर्दाफाश 'मुंबई लाइव्ह'ने काही दिवसांपूर्वी केला होता. 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तानंतर मंडळाने कायद्यापुढे नमते घेत अखेर ही घरे लाॅटरीतून वगळली आहेत.


मास्टरलिस्टमधील घरे कुठली ?

संक्रमण शिबिरातील ज्या मूळ रहिवाशांना पुनर्विकासातून कायमस्वरूपी घर मिळू शकत नाही, अशा रहिवाशांना मास्टरलिस्टमधील घरांचे वितरण म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून करण्यात येते. ही घरे याच रहिवाशांसाठी राखीव असतात, या घरांचे वितरण इतर कुणालाही करत येत नाही.

असे असतानाही मास्टरलिस्टमधील १५३ घरे वर्षानुवर्षे धूळ खात पडून आहेत. या घरांना मागणी नाही, असे म्हणत दुरूस्ती मंडळ आणि मुंबई मंडळाने ही घरे लाॅटरीत घेण्यासाठी मे महिन्यापासून प्रयत्न सुरू केले होते.


रहिवासीही संतप्त

या घरांचा लाॅटरीत समावेश करायचा असल्यास त्यासाठी म्हाडाला 'म्हाडा कायद्या'त बदल करावा लागेल. पण असा कोणताही बदल न करताच मुंबई मंडळ मास्टरलिस्टच्या घरांच्या मागे लागले होत. 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तानंतर म्हाडात चांगलीच खळबळ उडाली होती. शिवाय मास्टरलिस्टमधील रहिवाशांनी, संक्रमण शिबिरार्थींनीही यावर जोरदार आक्षेप घेत थेट उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला होता. या सर्व बाबी लक्षात घेता मुंबई मंडळाने अखेर मास्टरलिस्टच्या घराचा नाद सोडल्याचे दिसत आहे.



हे देखील वाचा -

म्हाडाच्या मास्टरलिस्टमध्ये मोठा घोटाळा? मूळ रहिवाशांच्या फायलीच गायब?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा