Advertisement

सात दिवसांत सोसायटी सदस्याला मिळणार ना हरकत प्रमाणपत्र


सात दिवसांत सोसायटी सदस्याला मिळणार ना हरकत प्रमाणपत्र
SHARES

मुंबई - आपल्य़ा हक्काचे घर विकण्यासाठी, भाड्याने देण्यासाठी, घराची दुरूस्ती करण्यासाठी वा घरासाठी कर्ज घेण्यासाठी अशा घराशी संबंधित एक ना अनेक बाबींसाठी फ्लॅटधारकाला सोसायटीकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. पण हे प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने वा सोसायटीकडून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याने फ्लॅटधारक, सदस्यांना त्रास सहन करावा लागतो. आता मात्र त्यांचा हा त्रास दूर होणार असून, केवळ सात दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे. सहकार विभागाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सात दिवसांच्या आत सोसायटीने ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक केले असून यासंबंधीचा अध्यादेशही जारी केला आहे. सरकारचा हा निर्णय स्वागताहार्य असून, त्याचा फायदा लाखो सोसायटी सदस्यांना मिळणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र सोसायटी ऑफ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी दिली आहे.
कायद्यानुसार 30 दिवसांत सोसायटीने ना हरकत प्रमाणपत्र द्यायला हवे. अन्यथा सदस्य त्या विरोधात कोर्टात दाद मागू शकतात. अनेक सदस्यांनी 30 दिवसांत प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची दखल घेत आता सात दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर सात दिवसांत सोसायटीने प्रमाणपत्र न दिल्यास उपनिबंधकाकडे दाद मागत उपनिबंधकाकडून प्रमाणपत्र घेता येणार आहे. त्यामुळे सोसायटी सदस्याची मोठी गैरसोय आता दूर झाली असून, सोसायट्याच्या मनामनी कारभाराला चाप लागणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा