Advertisement

ग्राहक तक्रार निवारण मंचाचा बिल्डरांना दणका


ग्राहक तक्रार निवारण मंचाचा बिल्डरांना दणका
SHARES

मुंबई - ग्राहक तक्रार निवारण मंचानं बिल्डरांना दणका दिलाय. प्रॉपर्टी कार्ड तयार करून देणे ही बिल्डरांचीच जबाबदारी आहे. त्यापासून बिल्डरांना पळता येणार नसल्याचा निकाल नुकताच मंचानं दिलाय. या महत्त्वाच्या निर्णयामुळे सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नियमानुसार सोसायटी स्थापन झाल्यानंतर चार महिन्यात कन्व्हेयन्स आणि प्रॉपर्टी कार्ड तयार करून देणं बंधनकारक आहे. मात्र जागेची मालकी आपल्याकडे रहावी यासाठी तसंच प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासाठी कोटींच्या घरात जाणारा खर्च वाचवण्यासाठी बिल्डर प्रॉपर्टी कार्ड करून घेत नाही. परिणामी मालकी बिल्डरकडेच राहते आणि त्याचा फटाक सोसायट्यांना पुनर्विकास करताना बसतो. हाच प्रक्रार घाटकोपरमधील अंबिका सिद्धू सोसायटीबरोबर होत होता. त्यामुळे 2009 मध्ये सोसायटीने मंचाकडे धाव घेतली होती. त्यानुसार मंचानं सोसायटीच्या बाजूनं निर्णय देत पुढच्या चार महिन्यांत प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्याचे आदेश दिलेत. अन्यथा बिल्डरविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही मंचानं नमूद केल्याची माहिती सोसायटीचे वकील विनोद संपत यांनी दिलीय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा