सेंसेक्स पुन्हा 30 हजारांपुढे

 Kala Ghoda
सेंसेक्स पुन्हा 30 हजारांपुढे
Kala Ghoda, Mumbai  -  

शेआर बाजाराच्या कामकाजाला बुधवारी सकाळी सुरूवात होताच मुंबई शेअर निर्देशांकाने 165 अंकांची उसळी घेत पुन्हा एकदा 30 हजाराची पातळी गाठली. राष्ट्रीय शेअर निर्देशांकातही 50 अंकांची वाढ झाली. एकीकडे मुंबई आणि राष्ट्रीय शेअर निर्देशांकात वाढ होत असतानाच सोने, क्रूड तेल आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे.

कामकाजाला सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर निर्देशांकाने 30 हजार 98 अंकांवर झेप घेतली, तर राष्ट्रीय निर्देशांक 9 हजार 365 अंकावर पोहचला. मुंबई शेअर बाजारात रिलायन्स, आयटीसी, बजाज ऑटो, महिंद्र अँड महिंद्र या कपन्यांचे समभाग तेजीत आले, तर विप्रो, टीसीएस, गेल, एचसीएल या कंपन्यांचे समभाग गडगडले.

Loading Comments