Advertisement

सेन्सेक्समध्ये 210 अंकांची घसरण


सेन्सेक्समध्ये 210 अंकांची घसरण
SHARES

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या छावण्यांवर हल्ले सुरू केले आहेत. या कारवाईचा व्हिडीओ मंगळवारी भारतीय लष्कराने जाहीर केला. याचा देशांतर्गत बाजारावर नकारात्मक परिणाम होऊन मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ 210.15 अंकांनी घसरून 30360.82 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 57.25 अंकांनी घटून 9381.00 वर स्थिरावला.

दिवसअखेरीस 2120 कंपन्यांचे शेअर्स घट नोंदवून बंद झाले, तर 602 शेअर्सनी वाढ नोंदवली. खासकरून लहान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 2 टक्क्यांनी घट झाली आहे. बीएसई मिडकॅपमधील रियायन्स कम्युनिकेशनमध्ये 8 टक्क्यांची घट झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement