Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी तेजीत

आशियाई बाजारांप्रमाणेच गुरूवारी भारतीय शेअर बाजारांनीही जोरदार सुरुवात केली. सेन्सेक्स १५० अंकांच्या वाढीसह उघडला.

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी तेजीत
SHARES

मागील दोन दिवस घसरत असलेल्या देशातील शेअर बाजारांनी गुरूवारी वाढ नोंदवली. वित्तसंस्था, हेल्थकेअर आणि धातू क्षेत्रात झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले. दिवसाअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३५९ अंकांनी वधारून ५२३०० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी  १०२ अंकांची वाढ नोंदवत १५७३७ वर स्थिरावला. 

आशियाई बाजारांप्रमाणेच गुरूवारी भारतीय शेअर बाजारांनीही जोरदार सुरुवात केली. सेन्सेक्स १५० अंकांच्या वाढीसह उघडला. दिवसभरात सेन्सेक्स ५२,३४६ पर्यंत पोहचला होता. तर निफ्टी ५० अंकांच्या तेजीने १५,६९२ वर उघडला. निफ्टी दिवसभरातील १५,८० अंकांच्या उच्चांकावर गेला होता. 

सेन्सेक्समधील ३० पैकी २३ शेअर तेजीसह वधारले. बजाज फायनान्स, एसबीआय, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, कोटक बँक, एचयूएल, ऍक्सिस बँक, एल अँड टी, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट, एचयूएल आदी शेअर्सने वाढ नोंदवली. तर नेस्ले, ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, मारुती , बजाज ऑटो या शेअर्समध्ये घसरण झाली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा