Advertisement

घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी वधारून बंद

सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने वाढ नोंदवली आहे. शुक्रवारी बँका आणि धातू कंपन्यांची शेअर्सने चांगली वाढ झाली.

घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी वधारून बंद
SHARES

सकाळच्या सत्रात घसरण नोंदवलेले शेअर बाजार (share market) नंतर सावरले. बाजार बंद होताना सेन्सेक्स (sensex) २२६ अंकांनी वधारून ५२९२५ वर बंद झाला. तर निफ्टीही (nifty) ६९ अंकांची वाढ नोंदवत १५८६० वर स्थिरावला. 

सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने वाढ नोंदवली आहे. शुक्रवारी बँका आणि धातू कंपन्यांची शेअर्सने चांगली वाढ झाली. टाटा स्टील, ऍक्सिस बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को इंडस्ट्रीजचे शेअर्स वधारले. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, एनटीपीसी, एचयूएल आदी शेअर घसरणीसह बंद झाले.

निफ्टी बँक, निफ्टी मेटल, पीएसयू बँक निर्देशांक १ ते २.५ टक्क्यांनी वधारले. बीएसई मिडकॅपमध्ये एक टक्का वाढ झाली. शुक्रवारी सेन्सेक्समधील ३० पैकी २० शेअर तेजीसह बंद झाले. मेटल इंडेक्समध्ये २.७९ टक्के वाढ झाली. तर बीएसई एनर्जी इंडेक्समध्ये १.७८ टक्के घसरण झाली.

इन्फोसिसची शेअर पुनर्खरेदी योजना आजपासून खुली झाली आहे. त्यामुळे इन्फोसिसच्या शेअर्समध्ये १.६ टक्के वाढ झाली.  इन्फोसिस ९२०० कोटींचे शेअर पुनर्खरेदी करणार आहे. दरम्यान, शुक्रवारी रिलायन्सच्या शेअर्सनी गेल्या महिन्याभरातील नीचांकी मूल्याची नोंद केली. रिलायन्सचाशेअर्स २.८ टक्क्यांनी घट नोंदवत २ हजार ९३ रुपयांवर आला. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा